मुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी, Swine flu in Mumbai

मुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी

मुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरत असल्याचं दिसून येत आहे. कल्याण येथे अन्वर शेख या व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. पोस्ट मॉर्टममधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

ताप आल्यामुळे कल्याणमधील रिक्षाचालक अन्वर शेख यांना आधी नित्यानंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचं कळलं. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना पुढील एक तासातच त्यांचा मृत्यू झाला.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात बदलापूर येथे राहाणाऱ्या एका महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. सायन हॉस्पिटलमध्ये या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता दुसऱ्या व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 1, 2013, 23:27


comments powered by Disqus