सुहास अवचट यांच्यावर महिलेचा छेडछाडीचा आरोपTampering complaint against Goa-Portuguese Hotel owner Su

सुहास अवचट यांच्यावर महिलेचा छेडछाडीचा आरोप

सुहास अवचट यांच्यावर महिलेचा छेडछाडीचा आरोप
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या माहिम भागातील प्रसिद्ध गोवा पोर्तुगिज हॉटेलचे मालक सुहास अवचट यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. भारतीय वंशाची कॅनडीयन अभिनेत्रीशी छेडछाड केल्याचा आणि असभ्य वर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनेडीयन अभिनेत्री आणि अवचट यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून मुंबईतल्या वर्सोवा इथल्या एका रेस्टॉरन्टच्या प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहे. हा वाद कोर्टापर्यंत गेलाय. याच प्रकरणी अवचट यांनी चर्चा करण्यासाठी सदर अभिनेत्रीला गोवा पोर्तुगिज हॉटेलमध्ये बोलावलं होतं. तिथं अवचट यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार आहे.

अवचट यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. दरम्यान पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपांची खात्री करत आहेत. इतक्या उशिरा तक्रार का दाखल करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होतोय.

पाहा व्हि़डिओ



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 7, 2014, 12:33


comments powered by Disqus