Last Updated: Wednesday, January 29, 2014, 20:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआता छोटे सामानाची खरेदी करण्यासाठी सुट्टे पैसे जवळ ठेवण्याची गरज नाही. लवकरच टॅप अँड गो कार्ड लॉन्च होणार आहे. या कार्डामुळे डाळी, तांदुळसह आपण ट्रेनचे तिकीटही खरेदी करू शकतो. जाणून घेऊ या अमोल देठे यांचा हा खास रिपोर्ट.....
आता छोट्या मोठ्या खरेदीसाठी खिशात सुट्टे पैसे घेऊन जाण्याच्या त्रासातून तुमची सुटका होणार आहे. लोकल ट्रेनचे तिकीट असो वा बसचा पास, तसेच भाजी बाजारात किंवा प्रोव्हिजन स्टोअर्समधील छोटी मोठी खरेदी असो याचे मूल्य आता टॅप अँड गो कार्ड लाँच करण्यात येणार आहे.
झी मीडियाला मिळालेल्या Exclusive माहितीनुसार आरबीआयची स्पेशल पेमेंट बॉडी एनपीसीआय या वर्षीच्या शेवटी असे कार्ड बाजारात आणणार आहेत. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर एक्सिस बँकेसोबत बंगळुरूमध्ये लॉन्च होणार आहे. त्यानंतर इतर बँकाही हा प्रकल्प लॉन्च करणार आहेत.
टॅप अँड गो कार्डचा वापर १० – १५ रुपयांच्या खरेदीसाठीही होणार आहे. या योजनेत छोट्या दुकानदारांना टॅपिंग डिव्हाइस देण्यात येणार आहे.
परदेशात टॅप अँड गो कार्डाचा वापर मेट्रो किंवा बसेसमध्ये करण्यात येतो. परंतु, किरकोळ विक्रीची व्यापकता वाढविण्यासाठी एनपीसीआयतर्फे हे पाऊल उचलण्यात येणार आहे. हे डेबिट कार्डाप्रमाणे तुमच्या सेविंग खात्याला लिंक असणार आहे. या कार्डाला केवळ टॅप करायचे आहे. डेबिट किंवा क्रेडीट कार्डाप्रमाणे स्वाइप, पीन आणि पेमेंट स्लिप साइन करण्याची गरज नसणार आहे.
मोठ्या प्रमाणात अफरातफर होऊ नये यासाठी याला छोट्या व्यवहारांसाठी डिझाइन करण्यात आले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 29, 2014, 20:54