ताडदेवमध्ये इमारतीला भीषण आग, २० जण अडकले

ताडदेवमध्ये इमारतीला भीषण आग, २० जण अडकले

ताडदेवमध्ये इमारतीला भीषण आग, २० जण अडकले
www.24taas.com, मुंबई


मुंबईतील ताडदेव भागात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. बस डेपोसमोरील एव्हरेस्ट टॉवर या इमारतीला भीषण आग लागली आहे.

आग भीषण असल्याने अग्नीशमन दलाच्या ८ बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. या आगीत १५ ते २० जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ताडदेव पोलीस स्टेशनसमोर `एव्हरेस्ट टॉवर` ही दहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्याला आग लागली.

आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही आग लागली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

First Published: Thursday, August 9, 2012, 17:58


comments powered by Disqus