Last Updated: Friday, November 9, 2012, 19:12
www.24taas.com, मुंबईइयत्ता चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडलीये. कुलाब्यातल्या महापालिकेच्या शाळेत शिवम चव्हाण या चौथीत शिकणा-या लहानग्याला शिक्षकाने एवढी जबर मारहाण केली, की त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागलं.
शुभमच्या डोक्याला, पायावर, हातावर, पाठीवर मारल्याने व्रण उमटलेत. शिक्षकाने केलेल्या या बेदम मारहाणीनंतर शिवमला सेन्ट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. शिवमची सिटीस्कॅन चाचणी करण्यात आलीये.
शिक्षकाच्या या राक्षसी अवतारामुळे शिवम मात्र पुरता भेदरून गेलाय. शिवमच्या कुटुंबियांनाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.
First Published: Friday, November 9, 2012, 18:56