पाणीपट्टी थकविणाऱ्यांत तेंडुलकर अन् ठाकरेही!, tendulkar & thackeray name includes in pending water b

पाणीपट्टी थकविणाऱ्यांत तेंडुलकर अन् ठाकरेही!

पाणीपट्टी थकविणाऱ्यांत तेंडुलकर अन् ठाकरेही!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कधीही कोणताही कर न थकवणारा अशी ख्याती असलेला भारतातला सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी असलेल्या सचिन तेंडुलकरने पाणीपट्टी मात्र थकवलीय. केवळ सचिन नव्हे तर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही या यादित समावेश आहे.

मुंबई महानगर पालिकेने पाणीपट्टी थकवणाऱ्यांची एक मोठी यादीच प्रसिद्ध केलीय. त्यात सचिन तेंडुलकरचं नाव आहे. सचिनने ३२,९२यंग२ रूपयांची रक्कम थकवल्याचं या यादीत नमूद करण्यात आलंय.

सचिनसह बाळासाहेब ठाकरे, अबू आझमी आणि माजी मुख्यमंत्री अंतुलेंचे कुटुंबीय यांचीही नावं आहेत. मुंबईत तब्बल २ लाख पाणीपट्टी थकवणारे आहेत. त्यांच्याकडून एक हजार कोटी रुपयांची थकबाकी पालिकेला येणं आहे. पालिकेच्या साईटवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आलीय. ३० तारखेपर्यंत ही यादी साईटवर पाहता येणार आहे.

`डीएनए` या वृत्तपत्राने याआधीही या संदर्भात वृत्त दाखवलं होतं. `डीएनए`ने अनेक वेळा सचिन तेंडुलकर, उद्धव ठाकरे यांना या संदर्भात बाजू मांडण्यासाठी विचारणा केली. मात्र, यातल्या कोणाचाही या संदर्भात संपर्क झालेला नाही.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 29, 2014, 14:05


comments powered by Disqus