व्यंगचित्राऐवजी विरोधालाच प्रसिद्धी जास्त- राज - Marathi News 24taas.com

व्यंगचित्राऐवजी विरोधालाच प्रसिद्धी जास्त- राज

www.24taas.com, मुंबई
 
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्रावरील वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे. 'मुळात डॉ. आंबेडकर तसेच ममता बॅनर्जी यांच्या व्यंगचित्राऐवजी त्याला होणाऱ्या विरोधालाच प्रसिद्धी मिळत आहे' . 'मी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील व्यंगचित्र पाहिलेले नाही'.
 
'त्यावर भाष्य करता येणार नाही'. पण व्यंगचित्रकाराला अभिव्यक्ति स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. 'व्यंगचित्र जातीपातीवर टिप्पणी करणारे नसावे, समाजप्रबोधन करणारे असावे. तसे  व्यंगचित्र असल्यास त्याबाबत कोणाला आक्षेप घेता येणार नाही'.
 
'व्यंगचित्रामागचा उद्देश समाजप्रबोधन करण्याचा असल्यास व्यंगचित्राचे स्वागत होणे अपेक्षित आहे'. मीडियामधून माझ्यावरही अनेकदा टीका झालेली आहे. मात्र मी कधीही त्याला विरोध केला नाही, कारण अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार मला मान्य आहे.  व्यंगचित्रकाराची भूमिका समजून न घेता त्याला विरोध करणे अयोग्य म्हणावे लागेल.
 

 
 
 
 

First Published: Sunday, May 13, 2012, 12:57


comments powered by Disqus