आप्पासाहेब धर्माधिकारीचं हेच समाजकार्य - Marathi News 24taas.com

आप्पासाहेब धर्माधिकारीचं हेच समाजकार्य

www.24taas.com, मुंबई
 
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्णबधीर विद्यार्थ्यांना मोफत श्रवणयंत्रांचं वाटप करण्यात आलं. प्रगती विद्यालयातल्या गरजू विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटपाचा हा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय इथं पार पडला.
 
गरजू विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही या आधुनिक श्रवणयंत्राचं वाटप करण्यात आलं. वाढदिवसासारख्या कार्यक्रमावर वायफळ खर्च करण्याऐवजी गरजू व्यक्तींना मदत कशाप्रकारे करता येईल असा प्रस्ताव सचिन धर्माधिकारी यांनी मांडला.
 
त्यानुसार हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रवणयंत्राचा वापर योग्यरितीने कशाप्रकारे करता येईल याचं प्रात्यक्षिकही देण्यात आलं. निरूपणातून समाजप्रबोधन असा समाजसेवेचा विडा उचलेल्या धर्माधिकारी कुटुंबाने वाढदिवसाच्या निमित्तानेही आपला समाजकार्याचं काम सुरूच  ठेवलं आहे.
 
 
 
 

First Published: Monday, May 14, 2012, 16:04


comments powered by Disqus