मुंबई पालिका तोडणार ८०० वृक्ष - Marathi News 24taas.com

मुंबई पालिका तोडणार ८०० वृक्ष


www.24taas.com, मुंबई
 
पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई, रस्ते दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेनं ८०० झाडे तोडायला परवानगी दिली आहे. जेवढी झाडं तोडली जातील तेवढीच पुन्हा लावू असं आश्वासन महापालिकेनं दिले आहे.
 
पावसाळ्यापुर्वी मुंबई महापालिका नाले सफाई, रस्ते आणि पाईपलाईन दुरुस्ती करत आहे. त्यासाठी पालिकेला  जवळपास ८०० झाडं तोडावी लागणार आहेत.  अनेक दिवसांपासून ही झाडे तोडण्यासाठी परवानगी द्यावी की नाही याचा घोळ सुरू होता. शेवटी जेवढी झाडे तोडली जाणार तेवढीच झाडे नव्याने लावण्याच्या बोलीवर झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
 
प्रत्येक पावसाळ्यापूर्वी महापालिका झाडे तोडते. त्यामुळं मुंबईच्या पर्यावरणावर विपरती परिणाम होत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतायेत. गेल्यावर्षी पालिकेनं 580 झाडं तोडली. मात्र त्याबदल्यात किती झाडं लावली याचा आकडा कोणाकडंच नाही. त्यामुळंच यावेळी महापालिकेनं आधी 800 झाडं लावावी नंतर 800 झाडं तोडावी असं पर्यावरण तज्ज्ञ सांगत आहेत. गेल्या पाच वर्षात किती झाडे तोडली आणि किती लावली याची आकडेवारी महापालिकला लवकरच जाहीर करणार आहे.
 

First Published: Wednesday, May 16, 2012, 09:30


comments powered by Disqus