Last Updated: Thursday, May 17, 2012, 21:33
www.24taas.com, मुंबई शिवसेनाकार्याध्यक्ष उध्दव ठाकरे मुंबईतील नालेसफाईचा आढावा घेत आहेत. मात्र चुनाभट्टीचा नाला सोमय्या महाविघालयानं बुजवल्याचं उघड झालयं. हे वारंवार पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यावर कारवाई कधी होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.
चुनाभट्टीचा नाला सोमय्या महाविद्यालयाकडून बुजवला गेल्याची तक्रार दुसऱ्या-तिसऱ्या कुणी केली नसून शिवसेना-भाजप युतीला पाठींबा देणारे अपक्ष नगरसेवक विजय तांडेल यांनी केलीय. एका नगरसेवकानं तक्रार करूनही सेना-भाजपची सत्ता असलेल्या पालिकेनं अद्याप सोमय्या महाविघालयावर कोणतीच कारवाई केलेली नाही. बुजवलेले नाले वाचवणं पालिकेचं काम आहे, अशी समजच पालकमंत्री नसिम खान यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिला होता. पण, पालकमंत्र्याच्या आदेशालाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हरताळ फासलाय.
चुनाभट्टीचा नाला पालकमंत्री असो, शिवसेनाकार्याध्यक्ष उध्दव ठाकरे असो वा मुंबईचे महापौर... या सर्वांच्या आदेशानंतरही नालेसफाई होत नसेल तर मग पालिका अधिकाऱ्यांवर जरब कोण ठेवणार?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय.
First Published: Thursday, May 17, 2012, 21:33