मुलुंडमध्ये मगरींचा वावर - Marathi News 24taas.com

मुलुंडमध्ये मगरींचा वावर

www.24taas.com, मुंबई
 
मुलुंडच्या गणपत पाडा भागात गुरूवारी रात्री मगर दिसल्यानं एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर मगरीला पकडण्यात यश आलं. काही दिवसांपूर्वी याच भागातल्या शाळेत बिबट्या शिरला होता.
 
गुरूवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान मुलुंड कॉलनीच्या गणपत पाड्यात नागरिकांचा असा गोंधळ सुरू होता. कारण  या ठिकाणी एका नाल्यात चक्क मगर दिसून आली होती. एक महिला कचरा टाकण्यासाठी गेली असता तिल्या नाल्यात  चक्क साडेसाह फूट लांबीची मगर त्यांना पाहायला मिळाली. पाड्याच्या जवळच असलेल्या तलावातून मगर आल्याची शक्यता वर्तवली जातेय.
 
स्थानिकांनी मगर दिसल्याची माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाचे अधिकारी काही वेळानं घटनास्थळी आले. त्यानंतर सुरू झाले मगरीला  दोन तासांच्या प्रय़त्नानंतर मगरीला पकडण्यात यश आलं. या मगरीला बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधल्या तलावामध्ये सोडण्यात येणार आहे.

First Published: Friday, May 18, 2012, 11:43


comments powered by Disqus