शेअर बाजारात मोठी घसरण - Marathi News 24taas.com

शेअर बाजारात मोठी घसरण

www.24taas.com, मुंबई
 
दोन दिवसांच्या नीचांकी घसरणीनंतर आज शेअर बाजार खुला होताना पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज धोकादायक 16 हजाराच्या खाली तर निफ्टी 5 हजार पातळीच्या खाली खुला झाला.
 
काल बाजार बंद होताना सकारात्मक 40 अंशांनी वधारला होता, पण आज सकाळी 232 अंशांची घट होत सेन्सेक्स 15 हजार 838 अंशांवर उघडला तर 73 अंशाची घट होत निफ्टी 4 हजार 796 अंशांवर उघडला.
 
ग्रीसमधली राजकीय अस्थिरतेमुळे युरो झोनमधली वाढलेली चिंता, त्याचा जागतिक स्टॉक्सवर झालेला परिणाम आणि त्यामुळे परदेशी फंडांत झालेल्या मोठ्या विक्रीमुळे शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 13 अंशांनी घसरून 54 पूर्णांक 60 वर उघडल्याचा परिणामही बाजारावर झाला. बाजार उघडताना सर्व सेक्टर्सचे निर्देशांक नकारात्मक पातळीवर होते.
 
शेअर बाजार खुला होताना मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स 16 हजार 119 अंशावर उघडलाय. त्यात 89 अंशांची वाढ झालीय. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 4 हजार880 अंशांवर खुला झालाय. त्यात 26 अंशांची वाढ झालीय. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 54 पूर्णांक 60 अंशांवर उघडलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 13 पैशांनी घसरलीय.

First Published: Friday, May 18, 2012, 12:33


comments powered by Disqus