Last Updated: Friday, May 18, 2012, 13:26
www.24taas.com, मुंबई मुंबईकरांसाठी एक वाईट बातमी. मुंबईकरांना 'बेस्ट' शॉक! बेस्ट बसने प्रवास करणार्या प्रवाशांना महिनाभरापूर्वी बसलेला भाडेवाढीचा चटका अजूनही गरम असतानाच आता मुंबई शहराच्या कुलाबा ते माहीम-वांद्रे या पट्टय़ातील बेस्टच्या १० लाख वीज ग्राहकांनाही दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हा मुंबईकरांना शॉक आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बेस्टला सरासरी २७.६ टक्के दरवाढ मंजूर केल्याने ग्राहकांवर तब्बल ७६१ कोटी रुपयांचा जादा बोजा पडणार आहे. त्यामुळे बेस्टने वीज दरवाढीचा निर्णय केला आहे. त्यामुळे ही वीज दरवाढ १ जूनपासून लागू होईल.
बेस्टने २0११-१२ या वित्तीय वर्षासाठी ४,५३७ रुपयांचा वार्षिक महसुली गरजेचा व त्यासाठी ५१ टक्के वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला होता. आयोगाने बुधवारी दिलेल्या आदेशाने महसुलात येणारी तूट ७६१ कोटींची दरवाढ करून भरून काढण्यास मंजुरी दिली आहे.
व्हिडिओ पाहा..
First Published: Friday, May 18, 2012, 13:26