परब परतले, पण जोत्स्ना दिघे काँग्रेसमध्येच - Marathi News 24taas.com

परब परतले, पण जोत्स्ना दिघे काँग्रेसमध्येच

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
नारायण राणे समर्थक जयंवत परब शिवसेनेत स्वगृही परतले असले,तरी जयंवत परब यांची समर्थक नगरसेविका जोत्स्ना दिघेनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय गुरूंनाच जोत्स्ना दिघेंनी आव्हान दिलंय. 
 
 जयंवत परबाच्या प्रवेशान शिवसेनेला फायदा होईल असा दावा शिवसेनेचे नेते करत आहेत.मात्र जयंवत परब यांची समर्थक नगरसेविका जोत्स्ना दिघेनी कॉग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतलाय. अंधेरीतील डी.एन. नगर वॉर्ड क्रमांक 60 मधून जोत्स्ना दिघे दोन टर्म्स नगरसेविका झाल्या  त्या परब यांच्याच आशिर्वादाने. परब यांच्या सततच्या राजकीय दुटप्पी भूमिकेमुळे काँग्रेस मध्येच राहण्याचा निर्णय घेतलाय.
 
जोत्स्ना दिघेंची ही भूमिका राजकीय स्वार्थापोटी असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. जोत्स्ना दिघेंना जयंवत परब यांनी नगरसेवक केलंय. त्यामुळे काँग्रेसमधून त्या निवडून येतील का ? असा सवाल शिवसेना महिला संघटकाने केलाय.
 
नगरसेविका जोत्स्ना दिघेंच्या निर्णयाने गुरूलाच शिष्याने आव्हान दिलंय. या आव्हानामुळे पालिका निवडणुकीत शिवसेनला फायदा होणार की तोटा हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

First Published: Thursday, December 1, 2011, 14:37


comments powered by Disqus