Last Updated: Monday, May 21, 2012, 09:50
www.24taas.com, मुंबई मुंबईतल्या रेव्ह पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाही आढळल्याचं पुढं आलंय. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी मनिषादेखील पार्टीत उपस्थित होती. पोलिसांनी मनिषाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. तसंच रेव्ह पार्टीचा आयोजक विषय हांडा याला पोलिसांनी अटक केलीय. हांडा हा ओक वूड हॉटेलचा डायरेक्टर आहे.
मुंबईच्या जुहू भागातील ‘ओक वूड’ या उच्चभ्रू हॉटेलवर छापा टाकला होता. रेव्ह पार्टी सुरु असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. या पार्टीत ३८ मुली आणि ५८ मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यात 19 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन आयपीएल खेळाडूंचा सहभाग असल्याचंही आता उघड झालंय. पुणे वॉरियर्स संघातला फास्ट बोलर वेन पॉर्नेल आणि स्पिनर राहुल शर्मा यांना पार्टीत सहभागी झाल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मेडिकल टेस्ट झाल्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंसह काही जणांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून देण्यात आलंय. अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
First Published: Monday, May 21, 2012, 09:50