Last Updated: Monday, May 21, 2012, 10:11
www.24taas.com, मुंबई २६-११च्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला आता फक्त शाकाहारी जेवण खावं लागतंय.
सध्या, कसाब आर्थर रोड तुरुंगात आहे. त्याला आता फक्त शाकाहारी जेवण मिळतंय. याअगोदर पोलीस खात्यातील सहा आचारी खास कसाबसाठी मांसाहारी जेवण बनवत होते. याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी आक्षेप घेतल्यानंतर या आचाऱ्यांना त्यांच्या आधीच्या ठिकाणी पाठवण्यात आलंय. कसाबला आता इतर कैद्याप्रमाणे जेलमधलं शाकाहारी जेवणच मिळणार आहे.
आता सध्या कसाबला सकाळी सात वाजता पोहे, उपमा, दूध आणि चहा हा नाष्टा देण्यात येतो. दहा वाजता दाळ रोटी, भात आणि भाजी असा आहार दिला जातो. दुपारी तीन वाजताही हाच आहार असतो. इतर कैद्यांनाही दिला जाणारा हा आहार आता कसाबलाही गुपचूप खावा लागणार आहे.
First Published: Monday, May 21, 2012, 10:11