Last Updated: Monday, May 21, 2012, 12:48
www.24taas.com, मुंबई बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांच्या घरी एका नाजूक पाहुण्याची 'एन्ट्री' झालीय. शिल्पानं नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय.
मुंबईमध्ये खार भागातल्या एक खाजगी हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी शिल्पानं एका मुलाला जन्म दिला. राज कुंद्रा यांच्या परिवारातील एका सदस्यानं ही बातमी सांगताना सांगितलं की, आई शिल्पा आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे. यावेळी हॉस्पिटलमध्ये शिल्पाची आई सुनंदा आणि बहिण शमिता शेट्टीही उपस्थित होत्या.
एका वर्षापूर्वीच शिल्पा लंडनस्थित व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. राज कुंद्रा यांना या बातमीनं इतका आनंद झाला की शेअर करण्यासाठी त्यांनी लागलीच ट्विटरची मदत घेतली. राजने ट्विटरवर लिहिलंय, ‘देवाच्या कृपेनं आम्हाला पुत्र रत्नाचा लाभ झालाय. आई आणि मुलगा दोघेही व्यवस्थित आहेत. मी खूप आनंदात आहे. मी शिल्पाचे मनापासून आभार मानतो. तिनं मला एक खूप मोलाची भेट दिलीय. हिंदूजा हॉस्पिटलचा स्टाफ आणि डॉक्टर किरण यांचाही मी आभारी आहे.’
First Published: Monday, May 21, 2012, 12:48