Last Updated: Monday, May 21, 2012, 23:21
www.24taas.com, मुंबई 
मुंबई महापालिकेच्या शालेय विघार्थ्यांना देणात येणाऱ्या २७ मोफत वस्तूमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. पालिकेनं शालेय वस्तूंची खरेदी बाजार भावापेक्षा जास्त दरात केल्याची तक्रार मनसेन पालिका आयुक्त सिताराम कुंटेकडे केली आहे. मनसेची ही तक्रार म्हणजे ब्लॅकमेंलिग असल्याची टीका महापौर सुनील प्रभू यांनी केली आहे.
MRP पेक्षा जास्त दरात खरेदी केलेल्या १८२ कोटीच्या कंत्राटाची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग,अँन्टी करपशन आणि केंद्राच्या व्हीजीलन्स विभागाकडे मनसेन तक्रार केली आहे. मुंबई महापालिकेनं शालेय विघार्थ्यांना देणाऱ्या मोफत २७ वस्तूंची खरेदी बाजार भावापेक्षा जास्त दरात केल्याची तक्रार मनसेन महापालिका आयुक्त सिताराम कुंटेकडे केली.
महापालिकेन शालेय वस्तूंसाठी १८२ कोटीच कंत्राट मंजूर केलं आहे.मात्र या शालेय वस्तू MRP पेक्षा जास्त दरात खरेदी केल्याचा आरोप मनसेन केला आहे. पालिकेन खरेदी केलेल्या वस्तू आणि बाजार भावाच्या किंमतीत बरीच तफावत आहे. याबाबत जास्त दरात खरेदी केलेल्या वस्तूंबाबत मनसेन तक्रार केली आहे.
First Published: Monday, May 21, 2012, 23:21