Last Updated: Saturday, December 3, 2011, 03:39
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबईतील मिठी नदीजवळ साचलेले डेब्रिज काढा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाने १0 दिवसा दिवसांची मुदत दिली आहे.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व न्या. रोशन दळवी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. मिठी नदीजवळ डेब्रिज टाकले जाणार, यासाठी तेथे बेरीकेट्स लावा तसेच येथील ५0 मीटर भाग मोकळा करा, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.
मिठी नदीच्या पात्रात भराव टाकून येथे मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नदीचे पात्र लहान झाले असून येथील तिवर नष्ट होत चालले असल्याने ही अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका जगदीश गांधी यांनी केली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत सध्या मिठी नदीजवळ डेब्रिज टाकले जात असल्याची माहिती गांधी यांच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली.
इमारतीचे दोन मजले होतील, एवढे डेब्रिज येथे टाकले गेले आहे. परिणामी, येथील २00 ते ५00 तिवर नष्ट झाले असल्याचे याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. त्याची दखल न्यायालयाने घेतली आहे.
First Published: Saturday, December 3, 2011, 03:39