लागला बारावीचा निकाल, टेन्शन घेऊ नका! - Marathi News 24taas.com

लागला बारावीचा निकाल, टेन्शन घेऊ नका!

www.24taas.com , मुंबई
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांवरील दडपण वेळीच कमी करून त्यांनाही पुढील यशासाठी नव्या उमेदीने तयार करण्याची गरज असते. हा समतोल साधण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय मंडळ उद्यापासून हेल्पलाइन सुरू करत आहे.
 
.
२७८९३७५६ हा मंडळाचा हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक आहे. उद्या दुपारी १ वाजल्यापासून सुरू होणारी ही हेल्पलाइन ३१ मेपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. शनिवार, २६ मे रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत आणि सुट्टीचे दिवस वगळता इतर दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहे. केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालक आणि महाविद्यालयांनाही या हेल्पलाइनचा लाभ घेता येणार आहे.
 
.
मंडळाने मार्गदर्शनासाठी १० समुपदेशकही नेमले आहेत. त्यांच्या सेवेचा २४ तास लाभ घेता येणार आहे. त्यांची नावे आणि भ्रमणध्वनी क्रमांकही मंडळाने पुढीलप्रमाणे दिले आहेत.
 
.
समुपदेशकांचे नाव भ्रमणध्वनी क्रमांक
मुरलीधर मोरे ९३२२१०५६१८
बी. के. हयाळीज ९४२३९४७२६६
विकास जाधव ९८६७८७४६२३/ ९६७९३७१११
एन. एम. भामरे ९०२९८०३५६३/ ९०२९८१०६३३
विजय देशमुख ८०८००४१८००
वि. वि. शिंदे ९८२००७३७८२
ए. डी. सरोदे ९३२२५२७०७६
अनिलकुमार गाढे ९९६९०३८०२०
स्मि. न. शिपूरकर ९८१९०१६२७०
संजय चौधरी ९८६९०२२२२४

First Published: Friday, May 25, 2012, 12:57


comments powered by Disqus