Last Updated: Sunday, May 27, 2012, 16:16
www.24taas.com, मुंबई भाजप अध्यक्ष नितीन गडकरी मातोश्रीवर दाखल झाले. आणि वेगवेगळे तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आलं. पण, आपण आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी बाळासाहेबांची भेट घेतल्याचा खुलासा गडकरींनी केलाय.
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नितीन गडकरींनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली होती. यावेळी, भाजपच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान झालेल्या गडकरींचा मार्ग खडतर असल्याचं मत शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केलं होतं. सामनामध्ये ही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर गडकरी शिवसेनाप्रमुखांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झाले होते. साहजिकच, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. त्यावर गडकरींनी खुलासा करून ही भेट वैयक्तिक असल्याचं सांगत वादावर पडदा टाकलाय.
First Published: Sunday, May 27, 2012, 16:16