मुंबईत भेसळयुक्त दूधाच्या रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News 24taas.com

मुंबईत भेसळयुक्त दूधाच्या रॅकेटचा पर्दाफाश

 www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतली भेसळयुक्त दुधानं मुंबईकर हैराण आहेत. मुंबईतल्या पवईमध्ये काही जागरूक नागरिकांनीच दुधाची भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पवईतल्या हिरानंदानी परिसरातल्या हरीओमनगर, गौतमनगर आणि हनुमाननगर भागात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.
 
मात्र, पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अखेर नागरिकांनीच मीडियाच्या मदतीने या भेसळयुक्त दुधाचा पर्दाफाश केला. यावेळी २०० लिटर दूध जप्त करण्यात आलं आहे.
 
दुधाच्या भेसळीचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. दूधात भेसळ करणारे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने त्यांना योग्य ते शासन हे झालेच पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.
 
 
 

First Published: Wednesday, May 30, 2012, 16:04


comments powered by Disqus