'फेसबूक'वरील फोटोच्या भीतीने खून! - Marathi News 24taas.com

'फेसबूक'वरील फोटोच्या भीतीने खून!

संजय प्रसाद, www.24taas.com, मुंबई
 
मुंबई पोलिसांनी एका विद्यार्थ्याच्या हत्येचा तब्बल 9 महिन्यांनी छडा लावलाय. विशेष म्हणजे एकमेकांचे जिवलग मित्र असलेले दोघे मित्र एकमेकांच्या जीवावर उठले. आणि मित्राच्या हत्येला कारण ठरलं ते एकमेकांची काढलेली छोटीशी खोडी आणि फेसबूक.
 
19 वर्षांच्या चेतन खानकरला त्याच्याच मित्राची हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलीय. चेतन खनकार आणि संजेश बोरकर एकमेकांचे चांगले मित्र होते. संजेशनं चेतनचे कमी कपड्यातले काही फोटो काढले होते, आणि ते फेसबुकवर टाकण्याची धमकी तो सतत चेतनला देत होता. याचाच राग मनात ठेऊन चेतननं संजेशला बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये नेलं आणि डोक्याच दगड घालून त्याची हत्या केली.
 
हत्या झाल्यानंतर पोलिसांना कुठलाच पुरावा मिळाला नव्हता. पण नंतर संदेशच्या मोबाईलचा शोध लागला आणि मोबाईलनं या घटनेचा पर्दाफाश केला. चेतन आणि संजेश बोरिवलीच्या एका टेक्निकल इन्स्टिट्युटमध्ये शिकत होते. पण एका छोट्याशा खोडीची किंमत संदेशच्या जीवावर उठली.

First Published: Wednesday, May 30, 2012, 19:19


comments powered by Disqus