Last Updated: Sunday, December 4, 2011, 17:20
झी २४ तास वेब टीम, मुंबई नालासोपारामध्ये 70 ते 80 रिक्षांची आणि 7 ते 8 टेम्पो फोडल्याची घटना घडली. मध्यरात्री आचाळे डोंगरी परिसरात ही घटना घडलीए. अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही तोडफोड केली. रिक्षा स्टँडच्या वादातून ही तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार करायला रिक्षाचालक तयार नाहीत. केवळ सात ते आठ रिक्षाचालकांनीच तक्रार केलीय.
या घटनेबाबत बोलायला पोलिसांनी नकार दिलाय. तर या नेहमीच्या घटना असल्याचं काही रिक्षाचालकांच म्हणण आहे. मात्र अंतर्गत भांडणात आमचं नुकसान होतय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. तर या घटनेच्या निषेधार्थ मनसेनं 9 डिसेंबरला वसई बंदी हाक दिलीय.
First Published: Sunday, December 4, 2011, 17:20