Last Updated: Thursday, May 31, 2012, 09:38
www.24taas.com, मुंबई म्हाडाच्या २ , ५१७ घरांच्या लॉटरीची सोडत आज गुरुवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात निघणार आहे. त्यामुळे आज घरांचा भाग्यवान कोण याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मुंबई आणि मिरा रोडमधील २ , ५९३ घरांसाठी यंदा मुंबई मंडळाकडे एक लाख पाच हजार २५२ तर कोकण मंडळाकडे ४६ हजार ७९३ असे १ लाख ५२ हजार ४५ ऑनलाइन अर्ज आले आहेत. अपंगांसाठीच्या दोन टक्के राखीव कोट्यातील २६ घरे आणि राज्य सरकारच्या विशेषाधिकारातील ५० घरे वगळता २ , ५१७ घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे.
लॉटरीत घरे अडीच हजार तर त्यासाठी दावेदार मात्र दीड लाख आहेत. यापैकी नवीन घरात जाण्याचे भाग्य किती अर्जदारांना लाभते याचा फैसला होण्यास आता काही तासांचीच प्रतीक्षा आहे. दरम्यान, म्हाडाने १७ हजार अर्ज अपुरे असल्याच्या कारणावरून निकाली काढले आहेत.
मुंबईतील घरांची लॉटरी सकाळी १० ते १ या वेळेत तर कोकण विभागतील मिरा रोडमधील घरांची दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत निघणार आहे.
First Published: Thursday, May 31, 2012, 09:38