Last Updated: Thursday, May 31, 2012, 10:53
www.24taas.com, भाईंदर भाईंदर येथील साईबाबा नगरात सुरेश कुमार या व्यक्तीचा त्याच्या राहत्या घरात खून करण्यात आला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्यानं गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला.त्यांच्या गुप्तांगावर गंभीर स्वरूपाची इजा करण्यात आली असून डोक्यावर,पोटावर,शरीराच्या इतर भागांवर पेपर कटरनं वार केल्याचे व्रण आहेत.
अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.आरडाओरड करू नये म्हणून सुरेश कुमार यांचं तोंड चिकटपट्टीनं बंद करण्यात आले होते.
सुरेश कुमार गोरेगाव येथील कंपनीत कामाला होता.पत्नी आणि मुले गावी गेल्यानं महिनांभरापासून सुरेशकुमार एकटाच राहत होता.याप्रकरणी नवघर पोलीस अधीक तपास करीत आहेत.
First Published: Thursday, May 31, 2012, 10:53