Last Updated: Thursday, May 31, 2012, 15:52
www.24taas.com, मुंबई ------------------------

पाहा म्हाडाची सोडत झालेली यादीम्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? विजेत्यांचे 'झी २४ तास'कडून हार्दिक अभिनंदन. आपलं नाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
------------------------

म्हाडाच्या लॉटरीला सुरवातम्हाडाच्या लॉटरीच्या सोडतीला सुरुवात झाली आहे. म्हाडाने आपल्या सोडतीला सुरवात केली आहे. अवघ्या मुंबईकरांचे लक्ष ज्यांच्याकडे लागून राहिले आहे. त्याचे काही निर्णय लवकरच आपल्या समोर येतील.
------------------------

म्हाडाने मुंबई आणि कोकण मंडळाअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घरांसाठीचे अर्ज भरण्यासाठी जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईटवरच आता आपल्याला ही सोडत (लॉटरी) पाहाता येणार आहे. मुंबई, म्हाडाच्या मुंबई मंडळ आणि कोकण मंडळाच्या २५१७ घरांसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून वांद्रे येथील रंगशारदामध्ये सोडत काढण्यात येत आहे. अर्जांची अंतिम छाननी पूर्ण झाली असून रंगशारदाचे सभागृहही सोडतीसाठी सज्ज करण्यात आले आहे.
२५९३ घरांसाठी आज सोडत - अत्यल्प उत्पन्न गट - एकूण घरे ७९८ एकूण अर्ज - ११ हजार ५०९- अल्प उत्पन्न गट - एकूण घरे १४७९, एकूण अर्ज - ७१ हजार ६७५- मध्यम उत्पन्न गट - एकूण घरे २३४, एकूण अर्ज - ३३ हजार ८७६- उच्च उत्पन्न गट - एकूण घरे १७२, एकूण अर्ज - २३ हजार ८०८ थेट प्रक्षेपणरंगशारदाबाहेरील मैदानावर अर्जदारांसाठी मंडप टाकण्यात आला असून सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी एलसीडीही लावण्यात आला आहे. दुपारी १.३० वाजल्यानंतर ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
First Published: Thursday, May 31, 2012, 15:52