Last Updated: Monday, December 5, 2011, 06:33
झी २४ तास वेब टीम, मुंबई काल सुमारे तीन हजार उमेदवारांनी मनसेची परीक्षा दिली. "या परीक्षेसाठी अभ्यास करुन उमेदवारांनी प्रमाणिकपणे परीक्षा दिली" या गोष्टीचं मला खूप समाधान वाटतंय, या शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारी झालेल्या परीक्षेबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
या आधारेच उमेदवारी दिली जाणार आहे. ज्या इच्छुकांना काही महत्त्वाच्या कारणांनी आज परीक्षा देता आली नाही त्यांची कारणे पाहून पुन्हा परीक्षा देता येईल. त्यांच्यासाठी दुसरा पेपर असेल.
इतर प्रश्नांमध्ये राज्यात महापालिका किती आहेत तालुके किती असे प्रश्न प्राधान्यानं होते. परीक्षेसाठी मुंबईत १२०८, ठाण्यात ३९७, नाशिकला ६४८, पुणे ६११, पिंपरी चिंचवड १८८ तर नागपूरला १०४ असे एकूण ३१५६ इच्छुकांनी परीक्षा दिली. आता इच्छुकांना निकालाची प्रतीक्षा आहे.
पुण्यात ८५० इच्छुकांनी ही परीक्षा दिली. निवडणुकीच्या उमेदवारीसाठी परीक्षा देण्याची उमेदवारांची पहिलीच वेळ होती. त्यामुळं सर्वच उमेदवारांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणं दिसत होता. विशेष म्हणजे सर्वच परीक्षा केंद्रांवर बाऊंसर तैनात करण्यात आले होते. तर मनसेच्या काही नेत्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षार्थी आणि सुपरविजन करणारे पदाधिकारी यांच्याशिवाय परीक्षा केंद्रात कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता.
First Published: Monday, December 5, 2011, 06:33