Last Updated: Friday, June 1, 2012, 08:58
www.24taas.com,मुंबई मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दूध भेसळ करणा-यांचा पर्दाफाश केलाय. खार परिसरातल्या खारदांडा आणि कांदिवलीतल्या लालजीपाडा भागात ही कारवाई करण्यात आलीये. या ठिकाणांहून हजारो लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे.
लालजीपाड्यातील कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आलय. तर खारदांड्यातून पाच जणांना ताब्यात घेण्यात आलेत. या भेसळखोरांपैकी 2 जण अल्पवयीन आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांनी ही धडक कारवाई केली आहे.
दूध भेसळ करणा-यांविरोधात कडक कारवाईची तरतूद असतानाही दूझ भेसळीचं प्रमाण कमी झालेलं नाही हे यावरुन स्पष्ट झालयं. जागतिक दूध दिवस आज असतानाच दुधाची भेसळ होत असल्यामुळे या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली.
First Published: Friday, June 1, 2012, 08:58