रेव्ह पार्टीचे सूत्रधार मोकाट - Marathi News 24taas.com

रेव्ह पार्टीचे सूत्रधार मोकाट

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतील जुहू रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्याला दहा दिवस उलटलेत. तरीही पार्टीची आयोजक तरुणी आणि ड्रग पेडलरला पकडण्यात पोलिसांना अपयश आलय. मुंबई पोलिसांचं हे अपयश म्हणावं लागेल.
 
मुंबई पोलिसांनी या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला खरा मात्र पार्टीच्या सूत्रधारांना पकडण्यात त्यांना अपयश आलयं. या पार्टीत आयपीएलचे खेळाडू, बॉलिवूड सेलिब्रेटींचा सहभाग होता. त्यामुळं पोलीस पार्टीच्या आयोजकांना पकडण्यात चालढकल करीत तर नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय.
 
या प्रकरणी अटक केलेला हॉटेलचा मालक विशेष हंडा याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. मुख्य सूत्रधार पकडण्यात अपय़श आल्यानं याचा फायदा विशेष हंडा याला तर होणार नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय.

First Published: Friday, June 1, 2012, 14:27


comments powered by Disqus