Last Updated: Saturday, June 2, 2012, 08:09
www.24taas.com, मुंबई राष्ट्वादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची आज नियुक्ती होत असून सध्याचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचीच पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे.
पिचडांचा प्रदेशाध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असाल्यानं प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीसाठी आज मुबंईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पिचडांची प्रदेशाध्यक्षपदी फेर निवडणूक होण्याची शक्यता असली तरीही धक्कातंत्रासाठी ओळखले जाणारे शरद पवार शेवटच्या क्षणी वेगळं नाव जाहीर करतील की काय, अशी चर्चा राष्ट्रवादीत आहे.
First Published: Saturday, June 2, 2012, 08:09