पश्चिम रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक - Marathi News 24taas.com

पश्चिम रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक

 www.24taas.com, मुंबई
 
आज तुमचा कुठे फिरायला जायचा बेत असेल आणि रेल्वेने प्रवास करण्याचा मानस असेल तर जरा थांबा... कारण आज मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक राहणार आहे.
 
पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलदगती मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावरून होणार आहे. तसंच मध्य रेल्वे मार्गावर ठाणे इथल्या यार्डाच्या नुतनीकरणासाठी आज मध्यरात्रीपासून मेगा ब्लॉक सुरू झालाय. तब्बल १६ तासांचा हा मेगाब्लॉक आज दुपारी साडे चारपर्यंत सुरू राहणार आहे.
 
कल्याण-ठाणे इथल्या धीम्या मार्गावरही मेगाब्लॉक असल्यानं कल्याण ते मुलुंड या मार्गावरील वाहतूक जलदगती मार्गावरून होणार आहे. त्यामुळे ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्टेशन्सवरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला आणि वडाळा ते माहीम या मार्गावरील वाहतूक सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत बंद राहणार आहे.

First Published: Sunday, June 3, 2012, 10:08


comments powered by Disqus