Last Updated: Tuesday, June 5, 2012, 08:31
www.24taas.com, मुंबई उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या घाटकोपर भागाचा अध्यक्ष इमरान शेखनं काल रात्री दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. इम्तियाज शेख आणि हुसैन शेख अशी हल्ला झालेल्या दोघांची नावं आहेत.
इमरान शेखची त्यांच्यासोबत जुनं वैमनस्य होतं. त्यातूनच हा हल्ला करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय़. हल्ल्यानंतर इम्तियाज आणि हुसैन दोघांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
उपचारादरम्यान इम्तियाजचा मृत्यू झाला तर हुसैनची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वाभिमान संघटनेचा घाटकोपर विभाग अध्यक्ष इमरान शेख आणि गणेश पाटील सह दोघाजणांना अटक केलीय.
First Published: Tuesday, June 5, 2012, 08:31