अण्णांची रॅली आज मुंबईत... - Marathi News 24taas.com

अण्णांची रॅली आज मुंबईत...

www.24taas.com, मुंबई
 
रविवारी दिल्लीत बाबा रामदेवांच्या एक दिवसाच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मुंबईत येणार आहेत. राज्यातल्या लोकायुक्त कायद्यासाठी ते सध्या राज्यभरात दौरा करत आहेत.
 
सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ते दिल्लीहून विमानानं निघाले. साडे दहा वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत. पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसमध्ये ते उतरतील.
 
दुपारी चार वाजता ते शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीवर जाणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पुन्हा एकदा आपली भूमिका मांडणार आहेत. तर संध्याकाळी सहा वाजता ते कामगार मैदानापासून एक रॅली काढणार आहेत.
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, June 5, 2012, 08:56


comments powered by Disqus