Last Updated: Tuesday, June 5, 2012, 09:33
www.24taas.com, मुंबई 
मुंबईतल्या ओशिवरा परिसरातील मसाला करी या रेस्टाँरंटवर छापा टाकून १२ ते १४ मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं ही कारवाई केली आहे.
पार्टीच्या नावाखाली देहविक्रीच्या व्यवसायासाठी मुली पाठवल्या जात होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यावेळी १७ ग्राहकांनाही ताब्यात घेतलं आहे.
ताब्यात घेण्य़ात आलेल्या मुलींमध्ये एका मॉडेलचाही समावेश आहे. या सगळ्यांवर पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून अनेक बारवर छापे घालण्यात येत आहेत. मात्र पोलीस ह्या व्यवसायांवर अंकुश ठेवण्यात अपयशी होत आहे.
First Published: Tuesday, June 5, 2012, 09:33