जलसंपदामंत्र्यांच्या मुलांच्या नावे करोडोंची संपदा! - Marathi News 24taas.com

जलसंपदामंत्र्यांच्या मुलांच्या नावे करोडोंची संपदा!

www.24taas.com, मुंबई
 
विविध घोटाळ्यांमुळं राज्य सरकार चर्चेत असताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे त्यांच्या मुलांच्या नावे असलेल्या संपत्तीमुळं चर्चेत आलेत. तटकरे यांच्या दोन मुलांच्या नावे ३८ कंपन्या असल्याचं उघड झालंय.
 
तटकरे यांना अनिकेत आणि अदिती अशी दोन मुलं आहेत. अनिकेतच्या नावे २५ तर आदितीच्या नावे १३ कंपन्यांची नोंद आहे. या कंपन्यांच्या मार्फत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचं उघड झालंय. शेकडो एकर जमिनीचे खरेदी व्यवहार, डेअरी, रियल इस्टेट आणि हॉटेल असे वेगवेगळ्या व्यवहारांची माहिती देणा-या कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली.
 
तटकरेंची मुलंच नाही तर त्यांच्या पीएच्या नावे शेकडो एकर जमिन खरेदीचे व्यवहार आहेत. या सर्व संपत्तीचं विवरण तटकरे यांनी निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना दिलेलं नाही. त्यामुळे मंत्री असताना कोणत्या मार्गानं ही संपत्ती आली आणि याची चौकशी होणार का हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

First Published: Wednesday, June 6, 2012, 14:47


comments powered by Disqus