मंगेशकरांसाठी कायद्यात पळवाट का? – राज ठाकरे - Marathi News 24taas.com

मंगेशकरांसाठी कायद्यात पळवाट का? – राज ठाकरे

झी २४ तास वेब टीम, मुंबई
मुंबईतील पेडर रोडवरील फ्लायओव्हर झाला नाही तर मुंबईत एकही फ्लाय ओव्हर होऊ देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याने पुन्हा एकदा पेडर रोड फ्लाय ओव्हरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्य सरकारला फ्लाय ओव्हर विरोधकांचा पुळका कशासाठी असा सवाल त्यांनी केला आहे. या फ्लायओव्हरबाबत स्थानिकांशीचर्चा करताय तर मग सगळ्याच फ्लाय ओव्हरबाबत तेथील स्थानिकांशी  चर्चा करा अशी मागणीही त्यांनी केलीय.
 
या संदर्भात मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली
 
मंगेशकरांना इतर पूल चालतात, मग पेडर  रोडवरील पुलाचा प्रॉब्लेम काय आहे, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. लतादीदींनी मुंबईकरांचा विचार करावा असं मनसेनं म्हटलं आहे.  हा फ्लाय ओव्हर रद्द केलेला नाही असं स्पष्टीकरण सरकारनं दिले आहे. त्यामुळं आता नेमकं काय होणार याची चर्चा सुरु झालीय.
 
काही स्थानिकांनी पेडर रोडला विरोध केल्यानं हा वाद सुरु झालाय. आता त्या वादात मनसेनं उडी घेतलीय. पेडर रोडचा फ्लायओव्हर रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय अजून झाला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
 
पेडर रोड प्लाय ओव्हरबाबत जनसुनावणी सुरु असून लोकभावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

First Published: Tuesday, December 6, 2011, 18:13


comments powered by Disqus