आदर्शचे सगळे आरोपी सुटले... जामिनावर - Marathi News 24taas.com

आदर्शचे सगळे आरोपी सुटले... जामिनावर

www.24taas.com, मुंबई
 
आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी सीबीआयला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी आरोपी असलेल्या रामानंद तिवारी आणि जयराज फाटक यांना जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाकडून त्यांना जामीन मिळाला आहे.
 
तिवारी आणि फाटक यांना जामीन मिळाल्यामुळं आदर्श घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सगळ्या ९ आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. २९ मेला आदर्श घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ७ जणांची पाच लाखाच्या जातमुचलक्यावर सुटका झाली होती.
 
यांत कन्हैयालाल गिडवानी, प्रदीप व्यास, एम.एम.वांच्छू, टी.के.कौल, ए.आर.कुमार, आर.सी.ठाकूर, पी.व्ही.देशमुख अशी त्यांची नावं होती. आता रामानंद तिवारी आणि जयराज फाटक यांनाही जामीन मिळाल्यानं सीबीआयचं हे मोठं अपयश असल्याचं बोललं जातं आहे. ६० दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यानं सीबीआयवर ही नामुष्की ओढवली आहे.
 
 
 
 
 

First Published: Thursday, June 7, 2012, 15:10


comments powered by Disqus