मुंबईचे हॉस्पिटल्स् परप्रांतियांनी भरलेत- राज - Marathi News 24taas.com

मुंबईचे हॉस्पिटल्स् परप्रांतियांनी भरलेत- राज

www.24taas.com, मुंबई
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबई महानगर पालिका आयुक्त सीताराम कुंठे यांची भेट घेण्यासाठी पालिकेच्या मुख्यालयात पोहचले आहेत. 'मुंबईत असणाऱ्या सरकारी दवाखान्यात फक्त परप्रांतियांची भरती असते, त्यामुळे मुंबईकरांना फायदा होत नाही. मुंबईने सगळ्यांचा ठेका घेतलेला नाही'. असं म्हणत राज ठाकरे यांनी परप्रांतियांवर पुन्हा टीका केली आहे.
 
पालिकेच्या मुख्यालयात राज यांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी दोघांमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल चर्चा झाली. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर राज यांनी मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा आयुक्तांपुढं वाचला.
 
राज यांनी मांडलेल्या प्रश्नांवर आयुक्तही सकारात्मक होते. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर राज यांनी मांडलेल्या प्रश्नांना विशेष महत्व आहे.
 
 
 

First Published: Thursday, June 7, 2012, 19:48


comments powered by Disqus