सुनील तटकरेंना मुख्यमंत्र्यांनी घातले पाठीशी - Marathi News 24taas.com

सुनील तटकरेंना मुख्यमंत्र्यांनी घातले पाठीशी

www.24taas.com, मुंबई
 
जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या मुलांच्या नावे ३८ कंपन्या असल्याचा आरोप शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केला होता. तसंच याप्रकरणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही चौकशीची मागणी केली होती.
 
परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र सुनील तटकरेंची पाठराखण केल्याचं दिसून येतं आहे. पुराव्यासह माझ्याकडे माहिती आली तर चौकशी करु. असं नेहमीचं पठडीतलं उत्तर त्यांनी दिलं.
 
तसंच आरोप करणे सोपे असते, असे आरोप कोणीही करतं. असं म्हणत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीर घेतलं नसल्याचंच दिसतं. विविध घोटाळ्यांमुळं राज्य सरकार चर्चेत असताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे त्यांच्या मुलांच्या नावे असलेल्या संपत्तीमुळं चर्चेत आले आहेत.
 
 
 
 
 

First Published: Thursday, June 7, 2012, 16:04


comments powered by Disqus