'म.रे.'ने केला खोळंबा, रेल्वे वाहतूक ठप्प - Marathi News 24taas.com

'म.रे.'ने केला खोळंबा, रेल्वे वाहतूक ठप्प

www.24taas.com, कल्याण
 
कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या कल्याणजवळ खोळंबल्या आहेत. त्यामुळे कसाऱ्याहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालेला आहे.
 
सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेचा सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनही ढीम्मच असल्याचे दिसून येते, ऐन पावसाळा तोंडावर रेल्वेचा हा गोंधळ आहे. तर पावसाळा सुरू झाल्यानंतर काय होणार आहे अशी चिंता प्रवाशी व्यक्त करीत आहेत.
 
गेले दोन दिवस वेगवेगळ्या कारणांनी मध्य रेल्वे ही ठप्प होत आहे. त्यामुळे प्रवाशी मात्र त्रस्त झाले आहेत. प्रवाशांना ऐन गर्दीच्या वेळी हा त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
 

First Published: Friday, June 8, 2012, 08:33


comments powered by Disqus