मुंबईतही भ्रूण हत्या ? - Marathi News 24taas.com

मुंबईतही भ्रूण हत्या ?

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईच्या कुर्ला भागात महापालिका शाळेजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ४ महिन्यांचं मृत भ्रूण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. एका पिशवीत बांधून  मृत भ्रूण कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आलं होतं.
 
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृत भ्रूण ताब्यात घेतलं आहे. राजावाडी हॉस्पिटच्या रिपोर्टनंतर हे स्त्री भ्रूण होतं का याबाबतचा खुलासा होईल. हे भ्रूण कुणी आणि कशासाठी फेकलं याचा पोलिस शोध घेत आहेत.
 
राज्यात अनेक ठिकाणी स्त्री भ्रूण असे प्रकार सरार्स सुरू आहेत.. त्यामुळे मुलींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे सरकार स्त्री भ्रूण हत्येवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असले तरी मुंबई सारख्या मोठ्या शहरात असे प्रकार घडत आहे..
 
 
 
 
 
 

First Published: Friday, June 8, 2012, 11:49


comments powered by Disqus