मुंबईत दोन अर्भकांची हत्या, भ्रूणहत्या ? - Marathi News 24taas.com

मुंबईत दोन अर्भकांची हत्या, भ्रूणहत्या ?

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईच्या कुर्ला भागात महापालिका शाळेजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दोन भ्रूण सापडली आहेत. एक ४ महिन्यांचं आणि दुसरं दोन महिन्याचं मृत भ्रूण सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
 
एका पिशवीत बांधून मृत भ्रूण कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आलं होतं. मुंबईत पहिल्यांदाच असे भ्रूण सापडल्याने पोलिसांनी याचा तपास करण्यासाठी विशेष पथक बनवले आहे.
 
कुर्ला व्ही बी नगर आणि आजबाजूच्या परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरचा शोध पोलीस घेत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी स्त्री भ्रूण असे प्रकार सरार्स सुरू आहेत.. त्यामुळे मुलींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
 
 
 

First Published: Friday, June 8, 2012, 12:25


comments powered by Disqus