Last Updated: Sunday, June 10, 2012, 20:12
www.24taas.com,मुंबई यापुढे राज्यात स्त्री भ्रूण हत्यांविरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना जल्लोषात झाली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. महिला सबलीकरणासाठी पावलं उचलण्याचे आवाहन पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलं. यानिमित्तानं राष्ट्रवादीने शक्तिप्रदर्शन केलय.षष्मुखानंद सभागृहात हजारो तरुणींच्या उपस्थितीत हा स्थापना सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या गाण्यावर राष्ट्रवादीच्या दिग्गजांनीही ताल धरला.. यात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंचाही सहभाग होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यापासून ते स्त्री सक्षमीकरणापर्यंतचं काम राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
पण राष्ट्रवादी युवती मंचच्या माध्यमातून सुप्रिया सुळे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा हा मार्ग असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय. स्वत: शरद पवार आणि राष्ट्रवादीचे राज्यातले सर्वच नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. तसेच राज्यभरातल्या प्रत्येक तालुक्यातल्या तरुणी या मेळाव्यात आल्या आहेत.
First Published: Sunday, June 10, 2012, 20:12