Last Updated: Monday, June 11, 2012, 23:15
www.24taas.com,मुंबई / पणजी महाराष्ट्रावर रुसून बसलेला मान्सून गोव्यात मात्र सक्रिय झालाय. मात्र महाराष्ट्रात मान्सून आलाय मात्र पावसाला अजूनही समाधानकारक सुरुवात झाली नाही, त्यामुळे खुद्द केंद्रीय कृषिमंत्री शऱद पवारांनी वरुणराजाला साकडं घातले आहे.
. ..येरे येरे पावसा असं आर्जव करत, बळीराजाला सुखावून जा, अशी विनवणी पवारांनी केलीय... आत्तापर्यंत आपण येरे पावसा, तुला देतो पैसा असं आर्जव करायचो आता पवार वरुणराजाला काय आमिष दाखवतात, हे पाहायचं..
गोव्याच्या सीमावर्ती भागात जोरदार पाऊस सुरु आहे. गोव्यात मान्सून सहा जूनलाच दाखल झालाय. मात्र त्याची तीव्रता फारशी नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु झालाय. गोव्याच्या सीमावर्ती भागात पावसाचा विशेष जोर आहे. गोव्याची राजधानी पणजीकडं मात्र पावसानं पाठ फिरवलीये. मात्र येत्या एक दोन दिवसात मान्सून पणजीवरही बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
मुंबईकरांना मान्सूनच्या पावसासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार अशी चिन्हे आहेत. शहरात अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्या तरी मान्सूनचं आगमन कधी होतय याची मुंबईकरांना प्रतीक्षा आहे. मान्सून कोकणात हर्णेपर्यंत तसंच साता-यापर्यंत येऊन थांबलाय. मात्र तो मुंबईकडे सरकण्यासाठी अजून किती अवधी लागेल याबाबत काहीच सांगता येत नाही.
व्हिडिओ.. मुंबईकरांना मान्सूनची प्रतिक्षा
First Published: Monday, June 11, 2012, 23:15