Last Updated: Tuesday, June 12, 2012, 14:45
www.24taas.com, मुंबई राज ठाकरेंनी राज्यातल्या टोल नाक्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केलीय. मुंबईत प्लॉस्टिकमुक्ती राबवण्यापेक्षा टोलमुक्ती अभियान राबवा असं आवाहन त्यांनी सरकारला केलंय.
मुख्यमंत्र्यांच्या प्लॉस्टिकमुक्ती अभियानाला त्यांनी टोला लगावलाय. टोलच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेची लूट सुरु असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. राज्यात जवळपास प्रत्येक महामार्गावर टोल नाके असून त्यांच्याकडून वाहनचालकांची मोठ्य़ा प्रमाणात लूट करण्यात येते.
रस्त्यांच्या देखभालींसाठी टोल उभारण्यात आलेत. मात्र प्रत्यक्षात टोलवसुली करणारे रस्त्यांची देशभाल दुरुस्ती करत नसल्याचा आरोप करण्यात येतोय.
First Published: Tuesday, June 12, 2012, 14:45