Last Updated: Tuesday, June 12, 2012, 18:23
www.24taas.com, मुंबई 
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज टोलविरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईत दहिसरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. राज ठाकरेंनी राज्यातल्या टोल नाक्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केली आहे.
मुंबईत प्लॉस्टिकमुक्ती राबवण्यापेक्षा टोलमुक्ती अभियान राबवा असं आवाहन त्यांनी सरकारला केलयं. दरम्यान, राज यांनी टोलविरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईत दहिसरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली.
दहिसरच्या टोलनाक्यावर मोठ्याप्रमाणात मनसैनिकांनी आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेला. आणि त्यानंतर टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या जमावावर लाठीचार्ज केला. तर अनेकांना ताब्यात घेतले आहे.
First Published: Tuesday, June 12, 2012, 18:23