Last Updated: Tuesday, June 12, 2012, 23:14
www.24taas.com, मुंबई काँग्रेसने मनसेच्या आंदोलनाचे समर्थन करून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. रस्त्यांच्या कामांचा खर्च वसुल होऊनही टोल नाके सुरू असले तर ते चुकीचे असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी झी 24 तासशी बोलताना स्पष्ट केलंय.
त्याचबरोबर अशा टोल नाक्यांविरोधात कुणी आंदोलन करत असेल तर त्यात काही गैर नाही असं सांगत माणिकरावांनी मनसेच्या आंदोलनाचे समर्थनेच केलं आहे.
राज यांच्या इशा-यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर तोडफोड करायला सुरुवात केली. त्यानंतर टोल नाक्यांना माझा विरोध नाही, रस्त्याचा खर्च वसूल झाल्यावर टोल वसुली करणं चुकीचं असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.

टोल नाक्यांसंदर्भातील सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने मनसेच्या आंदोलनाचे समर्थन करून काँग्रेसने राष्ट्रवादीला कोंडीत पकडले आहे. टोल नाक्यांची कंत्राटे देताना पारदर्शकता बाळगावी अशी मागणीही माणिकराव ठाकरे यांनी केलीय.
पाटबंधारे विभागाच्या श्वेतपत्रिकेनंतर आता टोल नाक्यांवरून काँग्रेसने राष्ट्रवादीला कोंडीत पकडल्याचं बोललं जातंय.
First Published: Tuesday, June 12, 2012, 23:14