सट्टेबाजांचा प्रणवदांना कौल, ८०० कोटींचा सट्टा! - Marathi News 24taas.com

सट्टेबाजांचा प्रणवदांना कौल, ८०० कोटींचा सट्टा!

www.24taas.com, मुंबई
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावावर फुली मारली असली तरी देशभरातील सट्टेबाजांनी प्रणवदांनाच पसंती दिली आहे. सट्टेबाजांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपतीपदावर सुमारे ८०० कोटींचा सट्टा लागला आहे.
 
सट्टेबाजांनी दिलेल्या रेट नुसार राष्ट्रपती भवनावरील पाटीवर बंगालमधून आलेले खासदार प्रणव मुखर्जीच आपले नाव कोरतील असे स्पष्ट होत आहे.
 
प्रणवदांना सट्टेबाजांनी १ रुपयाला ५० पैसे इतकी किंमत दिली आहे. तर मनमोहनसिंग यांना ६ रुपये ५० पैसे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना ८ रु. हामीत अन्सारी यांना १२ रुपये तर सोमनाथ चटर्जी यांना १८ रुपये रेट दिला आहे.

First Published: Thursday, June 14, 2012, 17:23


comments powered by Disqus