Last Updated: Friday, June 15, 2012, 18:00
www.24taas.com, मुंबई 
टोलच्या प्रश्नावर आधी चर्चा करा, आणि चर्चेनंतर काहीच झालं नाही, तर तोडफोड करा, असा सल्ला बाधंकाममंत्री छगन भुजबळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे. राज्याची प्रगती व्हावी अशी इच्छा असेल तर आधी चर्चा करा, सुधारणेला आम्ही तयार आहोत, असं भुजबळ म्हणाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या टोलविरोधी 'खळ्ळ खट्ट्याक'ला भुजबळांनी 'शालजोडीतल ं' असं उत्तर दिलेलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलविरोधी आंदोलनाच्या घोषणेनंतर मनसैनिकांची राज्यभर टोलधाड सुरु केली आहे. अनेक टोलनाक्य़ावर मनसैनिकांनी तोडफोड केली होती. पोलिसांचा बंदोबस्त झुगारुन ही तोडफोड करण्यात येत होती. आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
त्यामुळे प्रत्येक ठिकाणी टोलनाक्यावर करण्यात येणारी तोडफोड हे मनसेने आपल्या मनसे स्टाईलने केललं आंदोलन हे भुजबळांना मात्र पटलेलं नाही. आणि त्यामुळेच त्यांनी राज ठाकरेंना चर्चा करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे.
First Published: Friday, June 15, 2012, 18:00